संगीतकार जर स्वतः गायक असेल तर त्याला दुहेरी फायदा होत असतो गायक म्हणून तो इतर संगीतकारांकडे गाऊ शकत असतो आणि इतर संगीतकारांच्या अनेक चांगल्या गोष्टी तो आपल्या संगीतात आणू शकत असतो. किशोरकुमार आणि हेमंत कुमार हे दोघे ही संगीतकारा सोबतच स्वतः एक उत्तम पार्श्वगायक देखील होते. हेमंत कुमार यांनी हिंदी सिनेमा सृष्टीत बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ …