संगीतकार सचिन देव बर्मन मोठ्या राजघराण्यात जन्माला आले. राजघराण्यात जरी जन्मले असले तरी त्यांचे मित्रमंडळ सामान्य कुटुंबातील होते. या मित्रांसोबत त्यांची धमाल – मस्ती चालू असायची. एकदा सर्व मित्र रेल्वेने पिकनिकला गेले होते. मौज मजा मस्ती करून संध्याकाळी ते आपल्या घरी परत यायला निघाले. (S. D. Burman)