लता मंगेशकर यांचे आपल्या करीयरमध्ये अनेक संगीतकार/ गीतकार यांच्या सोबत मतभेद झाले होते. या मतभेदांच्या प्रश्नावरून लता काही वर्षात त्यांच्यासोबत काम देखील करत नव्हती. संगीतकार ओपी नय्यर यांच्याकडे तर लता मंगेशकर यांनी एक देखील गाणे गायले नाही. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे लता मंगेशकर ‘सितारो से आगे’(१९५७) या सिनेमा नंतर पुढची तीन-चार वर्ष त्यांच्याकडे…
भारतीय चित्रपट संगीतामध्ये लता मंगेशकर आशा भोसले यांच्या सोबतच ज्या स्वराने रसिकांना मोहित केले होते त्यामध्ये एक स्वर होता गीता दत्त यांचा. पन्नास आणि साठ च्या दशकामध्ये गीता दत्त यांनी अप्रतिम गाणी गाऊन भारतीय चित्रपट संगीत समृद्ध केलं आहे. लता अशा आणि गीता दत्त या दोघींची काही युगल गीते आहेत जसे क्या बताऊ मुहोब्बत है…