वारी! वारी म्हणजे तमाम महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचं श्रद्धास्थान. वारी एक परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तहान, भूक, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत सुरु असतो. अशाच एका नित्यनेमाने वारी करणाऱ्या विठ्ठल भक्ताच्या दृढ विश्वासावर आधारित चित्रपट म्हणजे ‘पंढरीची वारी’.