'झिम्मा', 'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी घेऊन येणार आहेत... ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या आगामी मराठी चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार…
अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.