संगीतकार राहुल देव बर्मन (R. D. Burman) यांना आपल्यातून जाऊन आता जवळपास तीस-पस्तीस वर्षे झाली असली तरी त्यांच्या संगीताची आणि त्यांनी त्यांच्या संगीतात केलेल्या प्रयोगांची चर्चा आज देखील समाज माध्यमावर होत असते.
गोल्डन इरामधील गाण्यांचे जसे चाहते आहेत तसाच एक चाहता वर्ग नव्वदच्या दशकातील गाण्यांचा देखील आहे. कारण हे दशक आपल्या देशासाठी खूप महत्वपूर्ण असे होते. जागतिकीकरणाच्या नव्या दिशा खुणावत होत्या. एक नवे मन्वंतर घडत होते. याच दशकातील एका गाजलेल्या गाण्याच्या मेकिंगचा हा किस्सा आहे. हॅरी बावेजा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील हे गीत आहे. या चित्रपटाची…
गायक कुमार सानू (Kumar sanu) यांनी गायलेल्या एका गाण्याला तब्बल दोन-अडीच वर्षानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. तोपर्यंत लोकांनी हे गाणं ऐकलं होतं पण त्या गाण्याला तितकीशी ओळख लाभली नव्हती. त्यानंतर मात्र गेल्या ३५ वर्षांपासून कुमार सानू यांचे ते सिग्नेचर सॉंग बनले आहे.