तेजाब हा तसं म्हटलं तर मसालापट होता. प्रेम, विरह, हाणामारी या साऱ्या गोष्टी यामध्ये होत्या. महेश देशमुख उर्फ मुन्ना आणि त्याची कॉलेजच्या दिवसातली प्रेयसी मोहिनी या दोघांची झालेली ताटातूट, महेश देशमुखचा मुन्ना होईपर्यंतचा आणि झाल्यानंतरचा प्रवास, मोहिनीचे स्वार्थी आणि मद्यपी वडील, मुन्ना – मोहिनीची प्रेमकहाणी यांच्या जोडीला एक ‘खतरनाक’ गुंड लोटिया पठाण असा सगळा मालमसाला…
दिलीप ठाकूर जवळपास चाळीस वर्षे सिनेपत्रकारीतेत ‘अॅक्टीव्ह ‘ आहेत. लहान मोठ्या फिल्म स्टुडिओपासून ते अनेक आऊटडोअर्स शूटिंगपर्यंत त्यांनी भटकंती/भेटीगाठी/निरीक्षण असा त्यांचा चौफेर आणि अनेक प्रकारच्या अनुभवांचा प्रवास सुरू आहे. अनेक आठवणी/माहिती/तपशील/संदर्भ त्यांच्याकडे आहेत. याच प्रवासात त्यांना अनेक सेलिब्रेटिजना भेटण्याचा योग येतोय. त्यातील ‘पहिल्या भेटी’च्या अनुभवांची ही मेजवानी….