सिनेमाचं वेड फिल्म दीवान्याला कोणत्या थेटरात घेऊन जाईल काही सांगता येत नाही याची खास आठवण. “एक दुजे के लिए ” (१९८१) सुपर हिट होतानाच हिंदी चित्रपट शौकीनांत कमल हसनचे चाहते निर्माण झाले, “हिम्मतवाला”ने (१९८३) श्रीदेवीची हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांत क्रेझ निर्माण झाली.
गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा!