मनमोहन देसाई दिग्दर्शित “रोटी” (Roti)च्या प्रत्येक डायलॉगवर (अर्थात संवादावर) पब्लिक फिदा होते. चित्रपट हे दृश्य माध्यम असले तरी आपल्या देशात ते बोलपट म्हणून जास्त रुजले ही वस्तुस्थिती.
काही काही दिग्दर्शकांनी “पब्लिकचे मनसोक्त मनमुराद मनोरंजन” करण्याचा जणू विडाच उचलला होता. पिक्चर म्हणजे फुल्ल एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट हेच त्यांचे बोधवाक्य त्यांना जमले की आपल्या पिक्चरच्या यशाच्या प्रगती पुस्तकात तब्बल नव्वद टक्के गुण मिळवले.
नव्वदच्या दशकातील म्युझिकल हिट जमान्याची सुरुवात ज्या चित्रपटांपासून झाली त्यापैकी एक होता राजश्री प्रॉडक्शनचा(Rajshri Production) ‘मैने प्यार किया’.
मनमोहन देसाई यांचा २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झालेला ‘अमर अकबर अँथनी’ हा ऑल टाईम ग्रेट मूव्ही आहे. हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंट असं या सिनेमाचं सूत्र होतं. मसाला सिनेमाचा बाप म्हणून हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. या सिनेमाबाबत खूप काही तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. तरी नित्य नव्या गोष्टींचा खुलासा होत राहतो.
दिग्दर्शकाला काय हवं असतं हे कलाकाराला माहीत असतं आणि कलाकाराच्या काय क्षमता आहेत हे दिग्दर्शकाला ठाऊक असतं. त्यामुळेच गुलजार आणि संजीव कुमार, शक्ती सामंत आणि राजेश खन्ना, मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन, बिमल रॉय आणि नूतन अशा अनेक जोड्या आपल्याला चटकन आठवतात.