भारतीय चित्रपट संगीतामध्ये वेस्टर्न म्युझिक चा अंतर्भाव चाळीसच्या दशकापासूनच होत होता. परंतु मुख्य संगीत धारेत त्याचं प्रमाण खूप कमी होतं. सी रामचंद्र यांनी काही पाश्चात्त्य ट्युन्सला हिंदीमध्ये आणले होते. गोरे गोरे ओ बांके छोरे, इना मीना डिका, मेरी जान मेरी जान संडे के संडे... ओ पी नय्यर यांच्या संगीतात देखील वेस्टर्न म्युझिकचा खरा प्रभाव दिसला.…
भारतीय सिनेमाचे गोल्डन इरामध्ये प्रत्येक नायकाची एका गायकासोबत चांगली जोडी जमली होती. पन्नास च्या दशकामध्ये दिलीप कुमार सुरुवातीला तलत मेहमूद आणि नंतर रफी यांच्या स्वरात गात होते. देव आनंद यांच्यासाठी किशोर कुमार यांचा स्वर अगदी फिक्स आणि परफेक्ट होता. तर राजकपूर यांच्यासाठी मुकेशचा स्वर! हे असं जरी असलं तरी काही वेळा त्यात बदल देखील होत होते.…
चेतन आनंद यांनी भारत- चीन युध्दा नंतर १९६४ ‘हकिकत’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट भारतातील पहिला युद्धपट म्हणून देखील ओळखला जातो. आज हा चित्रपटपद प्रदर्शित होऊन साठ वर्ष होऊन गेली तरी या चित्रपटाची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. या युद्धातील आपल्या देशाचा परभव हि प्रत्येकाच्या मनातील हळवी जखम आहे. या चित्रपटातील…
हिंदी सिनेमाच्या दुनियेत पहिल्यांदा नायकाचा रोल मिळालेल्या अभिनेत्याचा हा चित्रपट रिलीज मात्र त्याच्या मृत्यूनंतर झाला होता या संपूर्ण घटनेचा पिरेड हा तब्बल २२ वर्षांचा होता. हा चित्रपट बनायला प्रचंड वेळ लागला. चित्रपट निर्मितीच्या दरम्यान अनेक अडथळे आले. अनेकांचे मृत्यू झाले. शेवटी २२ वर्षानंतर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला. त्यावेळेला या चित्रपटाचा नायक देखील या दुनियेत…
आर के फिल्मचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट भले त्या काळात फ्लॉप झाला असला तरी नंतरच्या काळात मात्र या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. एक कल्ट क्लासिक मूवी म्हणून आज देखील हा चित्रपट ओळखला जातो.
दिग्दर्शक हा चित्रपटाचा बॉस असतो तसाच संगीतकार हा त्या चित्रपटातील गाणे निर्मितीच्या क्षेत्रातील बाप माणूस असतो. पण कधी कधी हे दोघे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात दखल अंदाजी करतात आणि त्यातून बऱ्याचदा काही गमतीशीर तर बऱ्याचदा गंभीर प्रसंग निर्माण होतात.
गायक कलाकार मन्नाडे यांनी एक गाणं बंगाली भाषेत १९६९ साली गायले होते. बंगाली भाषेतील हे प्रचंड लोकप्रिय असं गाणं ठरलं. आज देखील बंगालीमध्ये या गाण्याला प्रचंड मागणी आहे.
हिंदीसोबत इतर प्रादेशिक भाषेत गाणी गाणाऱ्या मन्ना डे यांनी आपल्या मराठी भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. पण गंमत म्हणजे बंगाली, हिंदी वगळता त्यांना इतर प्रादेशिक भाषा बोलता येत नसत, मराठी तर नाहीच नाही.
“एक चतुर नार…” हे गाणं गाण्यासाठी सुरुवातीला मन्ना डे तयार नव्हते. त्यासाठी त्यांची खूप मिनतवारी करावी लागली. अर्थात कोणताही गायक मास्टरजींसाठी गाणं गायला सहजी तयार झाला नसताच. याचं मुख्य कारण म्हणजे या गाण्यामध्ये मास्टरजी विद्यापथींकडून हरताना दाखविण्यात आलं आहे.
मन्ना डे यांचा आज जन्मदिवस.
मन्नाडॆ यांनी शास्त्रीय संगीतावर आधारीत असंख्य गाणी गावून आपल्या गुरूचे सूर अमर ठेवले. वयाच्या नव्वदीतही ते त्याच तडफेने गात असत. आज मन्ना डे यांच्या जयंती दिनी त्यांच्या गुरूचे देखील स्मरण!