गोल्डन इरा मध्ये प्रत्येक संगीतकाराने आणि नायकाने आपापले पार्श्वगायक निवडून घेतले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या जोड्या जमल्या होत्या. पण मन्नाडे हे असे एकमेव गायक होते जे तसे कोणाचेच लाडके नव्हते, कोणत्याही नायकासोबत अथवा संगीताकारासोबत त्यांची हमखास जोडी जमली नव्हती. शास्त्रोक्त गायकीवर त्यांची जबरदस्त कमांड होती. त्यामुळे ज्या ज्या वेळी सिनेमांमध्ये शास्त्रीय रागधारीवर आधारित गाण्यांची मागणी असायची…