लग्न… काळ बदलत गेला तसं लग्नसंस्थेच्या परिभाषाही बदलल्या. पुर्वीच्या काळात घरातील मोठी मंडळी त्यातही पुरुष मंडळी जो मुलगा पसंत करेल त्याच्याशी लग्न करायचं आणि संसार थाटायचा संच घडत आलं. काळानुरुप आणि शिक्षणामुळे स्त्रियांनी त्यांचे हक्क आणि वैचारिक स्वातंत्र्य याचं महत्व समजून अरेंज मॅरेज जरी असलं तरी आपला जोडीदार कसा हवा? याबद्दलच्या अपेक्षा त्या मांडू लागल्या आणि…