अनेकदा इराॅस थिएटरमध्ये इंग्रजी चित्रपट रिलीज होत असत ते पाहून मनात परकेपणाची भावना निर्माण होत असे. कारण शालेय जीवनात मराठी व हिंदी चित्रपट हाच आपला हुकमी मनोरंजनाचा एक्का एवढंच माहित होतं. हाय सोसायटीतील माणसंच फक्त इंग्रजी चित्रपट पाहतात. त्यांनाच तो समजतो, हे मनावर चांगले बिंबलं होतं