संगीतकार नौशाद (Naushad) यांचं भारतीय चित्रपटातील योगदान अतुलनीय असा आहे. चाळीसच्या दशकापासून थेट २००५ सालापर्यंत ते संगीताच्या दुनियेत ताठ मानेने उभे होते. एवढा प्रचंड कालखंड जरी त्यांनी सिनेमात काढला असला तरी त्यांच्या एकूण संगीतबध्द केलेल्या सिनेमांची संख्या अवघी ६४ भरते. त्यामुळे प्रत्येक सिनेमावरती किती मेहनत घेत होते याची कल्पना आपल्याला येईल.
भारतीय चित्रपट संगीतातील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संगीतकार नौशाद. चित्रपटाला संगीत देताना त्या गाण्यांमध्ये सिच्युएशन लक्षात घेऊन अगदी परफेक्ट भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत याचा आधार घेत इथल्या मातीतील अस्सल संगीत ते देत असंत.
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे संगीतकार मदन मोहन(madan mohan). अतिशय भावोत्कट चाली देणारा हा संगीतकार गझल प्रांतातील बादशहा होता.
हिंदी चित्रपट संगीताचा ट्रेंड बदलला होता. नौशाद यांच्या संगीतात गुणवत्ता होती पण त्या गुणवत्तेला पारखी नजरेने पाहणारा प्रेक्षक वर्ग आता उरला नव्हता. साधारणत १९९०च्या सुमारास नौशाद यांना आपल्या दोन्ही मुलांच्या करिअरचा प्रश्नदेखील भेडसावत होता.