हिंदी सिनेमातील काही गाणी आयकॉनिक असतात. गेली पन्नास-साठ वर्षे भारतात विवाह प्रसंगी बिदाईच्या वेळी एक गाणे हमखास वाजवले जाते आणि हे गाणे ऐकून प्रत्येक जण आतून हळहळतो, त्यांचे डोळे आसवांनी भरून येतात! हे गाणं गीतकार साहीर लुधियानवी यांनी लिहिलं होतं तर त्याला संगीत रवी यांनी दिलं होतं. १९६८ साली प्रदर्शित झालेल्या 'नीलकमल' या चित्रपटातील मोहम्मद…