मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट खलनायक म्हणजे निळू फुले (Nilu Phule)… ज्यांच्या अभिनयाचा खरं तर कुणाशीही सामना होणं शक्य नाही… कुठल्याही एका ठराविक कथेचा पिंजरा कवटाळून न घेता भारदस्त आवाज आणि कौशल अभिनय याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं… अभिनयासोबतच स्वातंत्र्यचळवळीतही सहभाग घेणारे निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे खापर पणतू… त्यामुळे नसानसात देशाप्रती प्रेम ओतप्रोत…