भारतीय सिनेमाला जगभर पोहोचवणारे ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांनी १९७७ साली एक हिंदी चित्रपट बनवला होता ’शतरंज के खिलाडी’. सत्यजित रे यांनी बनवलेला एकमेव पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट होता. (अर्थात नंतर त्यांनी 'सद्गती' नावाची एक शॉर्ट फिल्म १९८१ साली दूरदर्शन करीता बनवली होती.) या ’शतरंज के खिलाडी’ चित्रपटाला त्यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी…