मराठी चित्रपटाच्या चौफेर आणि दीर्घकालीन गौरवशाली इतिहासात काही चित्रपटगृहाचा विशेष सहभाग आहेच आहे. याचीही दखल घ्यायला हवी. मराठी चित्रपट रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या अशा चित्रपटगृहाचा विशेष सहभाग आहे. खरं तर एकूणच चित्रपटगृहाचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आणि त्यात एक भारतमाता चित्रपटगृह. आपलं वाटावं असं चित्रपटगृह. मुंबईतील गिरणगावातील हे चित्रपटगृह. लालबाग, परळ, काळा चौकी, भोईवाडा, भायखळा,…