फार कमी लोकांना माहिती असेल, पण प्रदीप पटवर्धन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये २५ रुपये रोजदारीवर (Daily Wages) काम केलं होतं. या दरम्यान त्यांनी इंटरबँक एकांकिका स्पर्धेमध्ये टेम्पल एम्प्लॉयमेंट नावाच्या एकांकिकेत काम केलं होतं. या एकांकिकेमधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी बँकेमध्ये त्यांचा सत्कार झाला होता. या प्रसंगानंतर बँकेतली त्यांची नोकरी पर्मनंट…