संगीतकार राहुल देव बर्मन (R. D. Burman) सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील आघाडीचा संगीतकार होते. त्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलून टाकला.
किशोर कुमारच्या अनेक आठवणी आज देखील आपल्याला अचंबित करतात. संगीतकार मदन मोहन यांच्याकडे एक गाणे किशोर कुमारने(kishore kumar) अक्षरशः अर्धा तासांमध्ये रेकोर्ड केले आणि लगेच धावत पळत जाऊन त्याने पंचमदाचे गाणे रेकॉर्ड केले आणि तिथून पळत जाऊन त्याने फ्लाईट पकडली!
एका मातेला तिच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी समजलीच नाही! किती वर्ष ? तब्बल तेरा वर्ष !! ती असं समजत होती की, माझा मुलगा लंडनला काही कामासाठी गेला आहे आणि लवकरच तो परत येईल. वस्तूतः तिचा हा कर्तबगार मुलगा मृत्यू पावलेला असतो आणि ही घटना तुम्ही आम्ही ओळखणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलावंताच्या बाबत घडली होती. कोण…