आज जर शोमन Raj Kapoor असते तर शंभर वर्षाचे झाले असते. १४ डिसेंबर १९२४ पेशावर पाकीस्तान येथे जन्मलेल्या राजकपूर (Raj Kapoor) यांची मुंबई ही कर्मभूमी.
चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत चित्रपट माध्यम व व्यवसायात ‘शूटिंगचा स्टुडिओ’ हा तर गाभा. त्याभोवती आणि त्यासह हे जग आहे. चित्रपट इतिहासातील सर्वात महत्वाचा घटक आणि त्याच्या जडणघडणीचा,काळानुसार बदलायचा प्रवासही अनेक वळणावळणांचा, खूपच मोठा. कधी काहीसा गुंतागुंतीचा. चित्रपटाचे जग बाहेरुन दिसतं तसे असणे शक्य आणि आवश्यकही नाही. पडद्यावर जो पिक्चर दिसतो त्यापेक्षा त्याचे पडद्यामागचे जग खूपच…