दिग्दर्शक मेहबूब खान यांनी १९४० साली नॅशनल पिक्चर्सने बनवलेल्या ‘औरत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात त्यांची पत्नी सरकार अख्तरने नायिकेची भूमिका केली होती. चित्रपट नायिका प्रधान होता आणि या सिनेमाला चांगले यश मिळाले होते. पंधरा वर्षानंतर मेहबूब यांनी याच चित्रपटाचा रिमेक मोठ्या भव्य स्वरूपात करायचे ठरवले. मेहबूब यांच्या मित्रांनी ‘औरत’ या सिनेमाचा रिमेक…
शम्मी कपूर यांचा सुपरहिट सिनेमा ‘ब्रह्मचारी’ २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन भप्पी सोनी यांनी केले होते. निर्मिती जी पी सिप्पी यांची होती. सिनेमा बिग बजेट होता. स्टोरी लाईन चांगली होती. म्युझिकली रिच होता. पण जेव्हा दिग्दर्शक भप्पी सोनी यांनी शम्मी कपूर यांना या सिनेमाची स्टोरी ऐकवली तेव्हा त्यांना स्टोरी तर आवडली, पण चित्रपट…
चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम हे सर्वज्ञात आहे. दिग्दर्शक म्हणजे चित्रपट निर्मिती युनिटचा कर्णधार असेही म्हटले जाते. त्याचं व्हीजन म्हणजेच चित्रपट. असे असूनही एखादा चित्रपट त्याच्या नावाशिवाय पडद्यावर येतो आणि इतकेच नव्हे तर सुपरहिट देखील होतो असे घडलयं. चित्रपटाच्या जगात कधी, काय, कशाला, कुठे घडेल हे अजिबात सांगता येत नाही हेच खरे.
पहिल्यांदा हे कधी घडले…
साठच्या दशकातील सुपरस्टार राजेंद्र कुमारला (Rajendra Kumar) खरं तर अभिनेता व्हायचंच नव्हतं ; त्याला दिग्दर्शक व्हायचं होतं! फाळणीनंतर तो जेंव्हा महानगरीत आला त्या वेळी दिग्दर्शक एच एस रवेल यांच्याकडे त्याने सहाय्यक म्हणून काम सुरू केले. पतंगा, सगाई, पॉकेटमार…. या सिनेमांकरीता दिग्दर्शन सहाय्य करताना किदार शर्मा यांनी त्याला ’जोगन’ सिनेमात एक छोटी भूमिका दिली. या सिनेमाचा…
हिंदी सिनेमाच्या साठच्या दशकातील ज्युबिली कुमार म्हणजे अभिनेता राजेंद्र कुमार(Rajendra Kumar)! याला ज्युबिली कुमार हे नाव यासाठी दिलं होतं की त्या काळी त्याचा प्रत्येक सिनेमा हा सिल्वर ज्युबिली होत असे. राजेंद्र कुमार चित्रपटाचा नायक असंण ही यशाची गॅरंटी असायची.