माणिक चटर्जी दिग्दर्शित रेखा विनोद मेहरा यांचा ‘घर’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. गुलजार यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली होती. तर संगीत राहुल देव बर्मन यांचं होतं. हा चित्रपट आज देखील या सिनेमातील गाण्यांसाठी आवर्जून आठवला जातो. आर डी बर्मन यांचा कुठलाही म्युझिकल शो या चित्रपटातील गाण्यांशिवाय अधुरा असतो. या सिनेमात…
हिंदी सिनेमाच्या संगीतात राहुल देव बर्मन नावाचा जो चमत्कार मागच्या शतकात होऊन गेला त्याला खरोखरच तोड नाही. आज पंचमदा यांना आपल्यातून जाऊन तीस वर्षाहून अधिक कालावधी जरी लोटला असला तरी त्यांच्या संगीताची, त्यांच्या गाण्याची आणि त्यांनी संगीतात केलेल्या प्रयोगाची आजदेखील चर्चा होत असते.