फिरत्या चित्रपटगृहांचे स्वतंत्र असे मनोरंजन विश्व आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी प्रेक्षक या चित्रपटगृहांचे हक्काचे प्रेक्षक आहेत. ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन असलेल्या याच टुरिंग टॉकीज मध्ये आता ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. मुंबई- पुण्यासारख्या शहरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे येणारा सिनेमा म्हणजे गावकऱ्यांना पर्वणीच. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय मागे पडला असला…
‘रावरंभा’ या सिनेमातून आपल्या समोर एक नवीन प्रेम कहाणी उलघडणार आहे.