मला कायमच असे वाटत आले आहे, काही ना काही कारणास्तव पडद्यावर येऊ न शकलेले चित्रपट पडद्यावर आले असते तर चित्रपटाचा इतिहास, भूगोल, गणित, भूमिती सगळेच बदलले असते. आणि प्रत्येक कलाकाराच्या प्रगती पुस्तकात असे न आलेले चित्रपट आहेत. ते कोणालाही चुकलेले नाही. आणि त्यातही मी तब्बल चार दशकं प्रत्यक्षात या चित्रपटसृष्टीत चौफेर वावरत असल्याने अशा पडद्यावर…