अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या 'बोलविता धनी' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे.
क्षितिजने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.…
हे नाटक महाराष्ट्रभर १०० ठिकाणी नेण्याचा मानस असून, तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे ₹१००, ₹२०० आणि ₹३०० ठेवण्यात आले आहेत.