रुना लैलाचा जन्म (१७ नोव्हेंबर १९५२) पूर्व पाकिस्तानात झाला (आताचा बांगलादेश). साठच्या दशकाच्या उत्तरार्धात तिने गायला सुरुवात केली आणि चांगलीच लोकप्रिय ठरली. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर ब्रिज दिग्दर्शित ‘एक से बढकर एक’ या चित्रपटापासून तिने भारतीय चित्रपटात गायला सुरुवात केली.