‘आखरी दाव’ नावाचा चित्रपट होता हे फारसं लक्षात का येत नाही, कारण तो गल्ला पेटीवर यशस्वी ठरला नाही. चित्रपटाच्या जगात कायमच यशाच्या कथा होतात. त्यातील काही यशात दंतकथाही सामिल होतात. आखरी दावबाबत काय झाले? स्टार पटकथाकार सलिम जावेद जोडीने काम करायचे त्या काळात त्यांची यशाची टक्केवारी भारी होती. या नावाला ग्लॅमर होते. वजन होते आणि…
सत्तरच्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्या काळातील सर्व नायिकांसोबत भूमिका केल्या समकालीन नायिकांसोबत (रेखा, मुमताज, मौसमी, झीनत, परवीन) तर भूमिका केल्याच केल्या. त्यांच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे, टीना मुनीम यांच्या सोबत देखील ते चमकले. पण त्यांना सीनियर असलेल्या शर्मिला टागोर, आशा पारेख, नंदा यांच्यासोबत देखील रुपेरी पडल्यावर नायक म्हणून राजेश खन्ना चमकले.…
हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बऱ्याचदा गमतीशीर प्रसंग घडतात. हा किस्सा खलनायक प्रेम चोप्रा यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितला होता. 'पॉकेट मार' या १९७४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही घटना घडली होती. मोठी गमतीशीर घटना होती. रमेश लखनपाल दिग्दर्शित ‘पॉकेटमार’ (१९७४) या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र, सायरा बानो, मेहमूद , प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.…