२०२५ हे वर्ष मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये गाजवलं... आणि यातलं महत्वाचं नाव म्हणजे संतोष जुवेकर (Santosh Juvekar)... लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava Movie 2025) चित्रपटात संतोषने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता... आणि या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी विकी कौशलला (Vicky Kaushal) माझ्याशिवाय सेटवर करमत नाही असं विधान त्याने केलं होतं... संतोषला त्याच्या या वक्तव्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला…