भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायिका सरस्वती राणे (Saraswati Rane) यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. त्यांचे वडील ख्यातनाम गायक आणि किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब आणि आई ताराबाई माने होत्या. सरस्वती बाई यांनी संगीताचे प्राथमिक धडे त्यांचे मोठे बंधू सुरेश बाबु माने आणि थोरली भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून घेतले. …