संगीतकार रोशन खूप अल्पायुषी ठरले. उण्या पुऱ्या पंधरा-वीस वर्षाच्या काळात त्यांनी पन्नासेक चित्रपटांना संगीत दिले. चित्रपटांची संख्या कमी असली तरी त्यांचं संगीत अप्रतिम असायचं.
पन्नासच्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारा हरफन मौला कलाकार किशोर कुमार (Kishore Kumar) याने साठच्या दशकाच्या मध्यवर्ती एक गंभीर चित्रपट बनवला होता. किशोर कुमार यांच्या अभिनय प्रकृतीला छेद देणारा हा चित्रपट होता.
कलासक्त व्यक्तीला व्यवहार समजतोच असे नाही. आपल्या कलेच्या विश्वात मश्गुल असणार्या कलावंताला कागदी दुनियेतील हिशेब समजत नाहीत. म्हणूनच ज्या वेळी कवी, गीतकार शैलेंद्रला ’तिसरी कसम’च्या निर्मितीच्या वेळी या फंदात पडू नका असाच सल्ला सर्वांनी दिला तरी शैलेंद्रने तो जुगार खेळलाच आणि वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेवून गेला. कलावंतांचं हे हळवेपण ’गुरूदत्त’ला देखील प्राण…
साधारणत: १९६५ सालानंतर या शंकर जय किशन युतीमध्ये फूट पडायला लागली पण त्यापूर्वी एका प्रसंगामध्ये या टीम मध्येच फूट होती. वाचली होती! राज कपूर यांच्या समंजसपणामुळे. नेमकं काय घडलं होतं? काय होता हा किस्सा?
कलाकारांची प्रतिभा ऐन मोक्याच्या वेळेला धोका देते. कित्येक वेळा हे कलाकार अगदी ब्लॅन्क होऊन जातात. यातून अनेक गमतीजमती देखील घडतात.