"शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते' कवितेची अशी सहज सोपी व्याख्या करणारे कवी सुधीर मोघे मराठी सारस्वतां च्या दरबारातील एक मानाचं पान. कवी, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणून लक्षणीय कामगिरी केलेले अष्टपैलू कलावंत सुधीर मोघे रसिकांचे अगदी लाडके होते. विलक्षण तरल आणि भावगर्भ गीतकाव्य त्यानी लिहिले.ग. दि .…