एकेक करत करत मुंबई तर झालेच पण राज्यातील, देशभरातील अनेक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जाताहेत. काहींचे नूतनीकरण होतेय इतकेच. तर काही केवळ आठवणीत राहताहेत. आता ग्रॅन्ड रोड पूर्वेकडील नॉव्हेल्टी चित्रपटगृहाची इमारत पाडण्यात येत असून अनेक फिल्म दीवाने त्यावरुन सोशल मिडियात व्यक्त होत आहेत. तसे हे चित्रपटगृहातील खेळ काही वर्षांपूर्वीच बंद झाला.…
चित्रपटाच्या पडद्यावर पोहचण्याच्या प्रवासात डिजिटल युग येण्यापूर्वी अगदी दीर्घकाळ प्रिन्टचे युग होते. पब्लिकच्या भाषेत त्याला रिळे म्हणत. त्यात एक दोन प्रकार असत. एखाद्या थिएटरबाहेर एखाद्या चित्रपटाची अशी रिळे दिसली तरी अनेक चित्रपट शौकिनाना आनंद होई; असे आणि इतके आपल्या पब्लिकने चित्रपटावर भरभरुन प्रेम केले.