मल्टीप्लेक्स, ओटीटीचा प्रभाव जसजसा वाढत वाढत जातोय, तस तशी जुन्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सची वाटचाल अधिकाधिक अवघड होत चाललीय...एकेक चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जातेय अशा बातमीची आता जणू सवय झाली आहे. आता दक्षिण मध्य मुंबईतील ग्रॅन्ड रोड पूर्वेकडील शालिमार चित्रपटगृहाचीही इमारत पाडली जात आहे....तेथील चित्रपटाचे खेळ काही वर्षांपूर्वीच बंद झाले होते. इतकेच नव्हे…