सत्तरच्या दशकामध्ये समांतर चित्रपट, आर्ट सिनेमा अर्थात कलात्मक चित्रपटांसाठी भारतात खूप चांगले दिवस होते. खरं तर सत्तरचे दशक हे भारतीय सिनेमासाठी अत्यंत स्थित्यंतराच्या दशक होते एकीकडे रोमँटक म्युझिकल सिनेमाच्या जागी ॲक्शन पॅक सिनेमाने आपला जॉनर दाखवायला सुरुवात केली होती. त्याचवेळी लो बजेट आशय गर्भ सशक्त कथानक मिनिंग फुल असे चित्रपट समांतर चित्रपटाच्या माध्यमातून येत होते.…
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट म्हणजे ‘जैत रे जैत’. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७७ मध्ये रिलीज झाला होता... नुकत्याच या चित्रपटाला ४८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला होता.. यावेळी पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत…
बॉलिवूडमधील एक अष्टपैलु अभिनेते म्हणजे नसीरुद्दीन शाह….१९७५ मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'निशांत' चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती…'बाजार', 'हम पांच', 'गुलामी', 'चमत्कार', 'सरफरोश', 'इक्बाल','फिराक' अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत… १९७५ मध्ये जरी हिरो म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली असली तरी १९६७ मध्ये अमन चित्रपटातून त्यांनी छोटेखानी भूमिका साकारत अभिनयाचा प्रवास सुरु केला होता…आज…
सागर सरहदी हे एक अतिशय संवेदनशील संवेदनशील आणि प्रतिभावंत दिग्दर्शक. त्यांनी संख्येने खूप चित्रपट कमी दिग्दर्शित केले पण जे बनवले ते कल्ट क्लासिक बनवले . आज इतक्या वर्षानंतर देखील त्यांच्या चित्रपटांची चर्चा अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये अभ्यास सत्रात होत असते. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘बाजार’ २१ मे १९८२ रोजी प्रदर्शित झाला. त्यापूर्वी सागर सरहदी यश…
मुंबई महानगरी हा एक अजस्त्र अजगर आहे. तो आलेल्या प्रत्येकाला गिळंकृत करून टाकत असतो. पोटाची खळगी भरायला आलेला प्रत्येक जीव या मुंबईत सामावला जातो. या शहराने हिंदुस्तानातील प्रत्येक कष्टकरी गरीब जीवाला आपलंसं केलं.या महानगरीतील कष्टकरी समाजाचं जीणं सिनेमाच्या पडद्यावर अनेकदा मांडलं गेलं. १९७८ साली मुजफ्फर अली यांनी ‘गमन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा संपूर्ण…
सौंदर्याची खाण आणि अष्टपैलु अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या 'उमराव जान' (Umrao Jaan Movie 1981) चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष पुर्ण झाली. आजही रेखा यांचं सौंदर्य लोकांना घायाळ करणारं आहे… ८०-९०चं दशकं आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या रेखा यांच्या करिअरमधील 'उमराव जान' हा चित्रपट टर्निंग पॉईंट नक्कीच ठरला होता.. मात्र, तुम्हाला माहित आहे का या चित्रपटासाठी रेखा नाही…
उत्कृष्ट साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करणे आपल्याकडे नवीन नाही. अनेक उत्तमोत्तम अशा देशातील , परदेशातील तसेच प्रादेशिक भाषेतील साहित्य कलाकृतीवरून सिनेमा बनले आहे. अर्थात साहित्य आणि सिनेमा या दोघांची तुलना होऊ शकत नाही. कारण दोघांचे व्यक्त होण्याचे माध्यम वेगवेगळे आहेत. पण तरीही चित्रपट हे माध्यम मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचल्यामुळे एका पुस्तकामुळे होणाऱ्या परिणामा पेक्षा चित्रपट हा…
‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही ५० वर्षांनी ‘सामना’ (Samana Movie) चित्रपटातील मारुती कांबळेबद्दल प्रश्न पडतोच... खरचं विजय तेंडूलकर यांच्या सामाजिक आणि राजकीय विषयांच्या सखोल अभ्यासातून ‘सामना’ चित्रपटाची कथा लिहिली गेली.. विशेष म्हणजे रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नवख्या चित्रपट दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तेंडूलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सामना’ सारखा अतिशय संवेदनशील चित्रपट डॉ. जब्बार पटेल…
भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil).... खरं तर खूर कमी काळ त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं पण त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नक्कीच कोरली गेली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्मिता पाटील चर्चेचा विषय ठरल्या असून निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील (Prateik Smita Patil)…
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी एक इतिहास रचला आहे. अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी मिळवणाऱ्या स्मिता पाटील यांचं वैयक्तिक जीवन बऱ्याच अडचणींनी वेढलेलं होतं. प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचं निधन झालं आणि त्याला वडील राज बब्बर यांनी नाही तर आजी-आजोबांनी लहानाचं मोठं केलं. आईचं निधन आणि वडील असूनही त्यांची न…