एम बी शेट्टी (M.B. Shetty) हे साठ आणि सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टंटचे बादशहा होते. १९५६ सालच्या ‘हिर’ या सिनेमा पासून ते मायानगरीत आले. १ जानेवारी १९३१ चा त्यांचा जन्म. मूळगाव मंगलोर कर्नाटक. बॉक्सिंग, बॉडी बिल्डींग आणि स्टंटची पहिल्यापासूनच आवड आणि बिनधास्त स्वभाव, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये. हा किस्सा आहे त्यांच्या साठच्या दशकातील एका चित्रपटाचा…