'मोनिशा बेटा इट्स टू मिडिल क्लास' हा संवाद ऐकला की लगेच डोळ्यासमोर येते ती हाय क्लास, रिच, सुफीस्टीकेटेड, इंग्लिश बोलणारी साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतील माया साराभाई. सतत आपल्या हाय क्लासचा, श्रीमंतीचा तोरा मिरवणारी माया साराभाई आजही सर्वच प्रेक्षकांना आठवत असेल. आठवत असेल काय …? आठवणारच कारण माया साराभाईला विसरणे कोणालाच शक्य नाही. आपल्या प्रभावी अभिनयाने…
एव्हाना मुंबईतील चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर माटुंगा येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणची अरोरा थिएटरची इमारत आणि ते खास करुन दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे हक्काचे चित्रपटगृह याची आठवण आली असेलच. दक्षिणेकडील तेजुकाया पार्कच्या कांती महलसारखी इमारत हे अरोराचे वैशिष्ट्य. चित्रपटगृहाचं आपलं एक वेगळेपण असावे हे वैशिष्ट्य अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या बाबतीत जपलेले दिसेल.
चित्रपट दृश्य माध्यम असले तरी आपल्या चित्रपट प्रेक्षक संस्कृतीत ते डायलॉगसाठी जास्त लोकप्रिय आहे. एखाद्या कलाकाराच्या एक्स्प्रेशनला टाळ्या मिळण्यापेक्षा भारी संवादाला हाऊसफुल्ल थेटरात टाळ्या शिट्ट्या हुकमी. ती एक भन्नाट संस्कृती. दोन सुपर हिट डायलॉगने तर बरेच काही घडवले हे चित्रपट रसिकांच्या मागच्या पिढीने चांगलेच अनुभवलयं.
नव्वदच्या दशकात कुलाब्यातील मुकेश मिलमध्ये एकाद्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग रिपोर्टीग अथवा एकाद्या मुलाखतीसाठी गेल्यावर अधूनमधून स्ट्रॅन्डवर चक्कर मारायचो. आपली सिनेपत्रकारीतेची पाळेमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये खोलवर रुजलीत हे मी कधीच विसरणार नाही
नवीन शतकाच्या सुरुवातीस आपल्याकडे मल्टीप्लेक्स युगाची सुरुवात झाली. पूर्वीची हजार, बाराशे, चौदाशेची प्रेक्षकसंख्या आता फारच जास्त वाटू लागली. पिक्चर पाहण्यातील खरी मजा एवढ्या पब्लिकच्या हाऊसफुल्ल गर्दीच्या संस्कृतीत होती. ती कालबाह्य होत असतानाच २००६ साली एक वर्षासाठी स्टर्लिंग बंद ठेवून त्यात तीन स्क्रीन अर्थात मल्टीप्लेक्स फ्लेवर देण्यात आला आणि २००७ ला पुन्हा सुरु झाले.
लिबर्टीत पूर्वीपासून मॅटीनी शोची प्रथा होती. कधी जुने तर कधी नवीन सिनेमा मॅटीनीला येत. ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’ मी येथेच मॅटीनी शोला पाहिला. आजूबाजूला सगळेच बुध्दीवादी आणि त्यात मी एकटाच टाळ्या वाजवत सिनेमा एन्जाॅय करणारा. समांतर अथवा न्यू वेव्ह चित्रपटांसाठी लिबर्टी मॅटीनी परफेक्ट होते.
अलेक्झांड्रा थिएटरची ‘विशेष दखल’ घेण्याची ठळक कारणे म्हणजे, येथे प्रामुख्याने हाॅलिवूडचे बी आणि सी ग्रेड चित्रपटाचे हिंदीत काही वेगळेच नामकरण करुन ते प्रदर्शित होत आणि ते हिंदीतील नाव वाचण्यातही एक प्रकारचे मनोरंजन असे.
गोविंदाग्रज या नावाने कविता लेखन, बाळकराम नावाने विनोदी लेखन करणाऱ्या, नाटककार राम गणेश गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त उजाळा देऊया काही आठवणींना…
सेन्ट्रलला हिंदी सिनेमाही यश मिळवत. वह कौन थी, प्यार का मौसम, परवरीश, चाचा भतिजा येथेच ज्युबिली हिट. तसेच अमिताभचा ‘संजोग’, संजीवकुमार – राखीचा पारस, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘बटाटा वडा…’ गाणे असलेला ‘हिफाजत’ असे अनेक सिनेमा तर, तुलसी विवाह, अलख निरंजन वगैरे पौराणिक सिनेमाही इथेच इथे रिलीज झाले.
गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा!