‘तिघी’ या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक प्रवास यांचा सखोल वेध घेणाऱ्या या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक संवेदनशील आणि भावस्पर्शी गाणे ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विशेष म्हणजे, आई–मुलीच्या नात्याचा हळुवार आणि भावनिक प्रवास मांडणारे हे गाणे…