अभिनेत्री पल्लवी जोशी सांगतात, “एक चित्रपट तितकाच उत्तम असतो जितकी त्याची स्क्रिप्ट आणि द काश्मीर फाईल्सच्या सहाय्याने प्रेक्षक पात्रांच्या भावना अनुभवू शकतात आणि सहन करू शकतात ज्यातून ती पात्र गेली आहेत. प्रत्येक कलाकाराने स्वतःला त्या पात्रांमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले आहे आणि ते ही धक्कादायक आणि दुःखद कथा सांगण्यासाठी वचनबद्ध आहे.”
‘A Thursday’ चित्रपटातील यामीचा हा ‘फर्स्ट लूक’ पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. यामध्ये यामी गौतम कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये फोन करते आणि सांगते की, ती ज्या शाळेत शिकवते तिथल्या १६ विद्यार्थांना डांबून ठेवले आहे. त्यानंतर यामी पोलिसांना तिच्या मागण्या सांगते. मग तेव्हाच या सीनमध्ये नेहा धुपियाची एंट्री होते.
सिनेमा आणि प्रेक्षकांना जोडणारी मधली महत्वाची पायरी म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर… कालानुरूप त्यात होत गेलेले बदल जाणून घेऊया या लेखात.