ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या गाण्याबद्दल, त्यांच्या दिलदारपणा बद्दल आज देखील खूप बोललं जातं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगांवर आज देखील सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. मोहम्मद रफी जितके चांगले पार्श्वगायक होते तितकेच किंबहुना त्याहून जास्त ते दरियादिल इन्सान होते. चित्रपट संगीत गाताना कधीही त्यांनी छोटा संगीतकार / मोठा संगीतकार किंवा छोटा अभिनेता /…
बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरीच कलाकार मंडळी सामाजिक कार्यात आपला हातभार लावत असतात... काही कलाकार जगजाहिरपणे आपलं सामाजिक कार्य लोकांसमोर मांडतात तर काही जणं गुपचूप आपलं काम सुरु ठेवतात... अशाच एका गायिकेने सध्या ३००० पेक्षा अधिक मुचालांना जीवनदान देण्याचं मोठं सामाजिक कार्य केलं आहे... पलक मुच्छल हिच्या नावे चालणाऱ्या पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील…
सध्या सोशल मिडियाच्या काळात कधी कोणती अभिनेत्री रातोरात स्टार होईल याचा काही नेम नाही... शिवाय, नवे काहीतरी ट्रेण्ड सुरुच असतात... आता नॅशनल क्रशचा (National Crush Trend) ट्रेण्ड पुन्हा चर्चेत आला असून या आधी रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांना नॅशनल क्रशचा टॅग मिळाला होता... आणि आता निळ्या साडीतली गोड आणि सुंदर दिसणार मराठमोळी अभिनेत्री सगळ्याचं लक्ष…
जवळपास प्रत्येक कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक, तंत्रज्ञ यांच्या प्रगती पुस्तकात एक हमखास असणारी गोष्ट, एखादा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडणे, एखादा चित्रपट दोन चार रिळांत बंद पडणे, एखादा चित्रपट पूर्ण होता होता बंद पडणे हे होत असतं. ही देखील एक रंगतदार आणि या चित्रपट व्यवसायाचे अंतरंग दाखवणारी गोष्ट... हे दिग्दर्शक राज खोसला यांनाही चुकलेले…
अभिनेते के के मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी 'स्पेशल ऑप्स' वेब सीरीज प्रेक्षकांना विशेष आवडली. सीरीजच्या पहिल्या भागात हिम्मत सिंग कसा घडला हे प्रेक्षकांना कथानकातून पाहायला मिळालं. आणि सीरीजच्या दुसऱ्या भागात 'स्पेशल ऑप्स सीझन २' (Special Ops 2) मध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत. नुकतीच सीझनच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात…
गाणं माहित असतं,आपण ते ऐकत असतो, गुणगुणत असतो,ते आवडत असतं,हळदीला त्यावर हमखास झक्कास ठेका धरला जातो, वाढदिवसाच्या सोहळ्यात ऐकायला मिळतं,त्यावर आपण नाचतोही,ते गाणं मूळ आवाजात कोणाचं आहे हे आपल्याला माहित नसतं, माहित करुन घ्यावं असंही वाटत नाही,आता रीमिक्स अवतारात कोणी गायलयं हेही माहित नाही. कधी काळी ते पिकनिकला गाण्यांच्या भेंड्यात गायलं जाई,आता डीजेवर वाजवलं जातंय.अशी…
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी एक इतिहास रचला आहे. अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी मिळवणाऱ्या स्मिता पाटील यांचं वैयक्तिक जीवन बऱ्याच अडचणींनी वेढलेलं होतं. प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचं निधन झालं आणि त्याला वडील राज बब्बर यांनी नाही तर आजी-आजोबांनी लहानाचं मोठं केलं. आईचं निधन आणि वडील असूनही त्यांची न…
Angry Young Man अशी ओळख कमावणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आजवर आपण विविध भूमिकांमधून पाहिलं आहे. अशीच त्यांची एक वेगळी अभिनयाची बाजू मांडणारा चित्रपट ‘भूतनाथ’ (Bhoothnath) २००८ मध्ये आला होता. ज्यात अमिताभ बच्चन चक्क भूत झाले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक अधिकच बच्चन यांच्या प्रेमात पडले होते. चित्रपटात त्यांच्या बायकोची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री…
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) त्याच्या चित्रपट, मालिकांमुळे चर्चत आहेच पण सध्या तो एका मोठ्या अडचणीत अडकला आहे. श्रेयस तळपदेसह १५ जणांवर उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा श्रेयस्कर आरोप करण्यात आला आहे.‘द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ (LUCC) या चिटफंड कंपनीच्या नावाखाली ग्रामीण…
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava movie) हा ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) याने साकारलेले शंभुराजे प्रेक्षकांना भावलेच पण या चित्रपटात इतर मराठी कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आवडल्याही आणि काहींना प्रेक्षकांनी शिव्या-श्रापही दिले. त्यातीलच कान्होजींच्या भुमिकेत असणाऱ्या सुव्रत जोशी (Suvrat joshi) याला त्याच्या भूमिकेवरुन लोकांनी ट्रोल करत खडे…