उद्या १५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. हाच दिवस सिने रसिकांना आणखी एका कारणासाठी कायम लक्षात राहतो. ते कारण म्हणजे याच दिवशी १५ ऑगस्ट १९७५ ला मागच्या शतकातील महान सिनेमा ‘शोले’ प्रदर्शित झाला होता. याच सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळचा हा किस्सा.
आज जो किस्सा मी आपल्या सोबत शेअर करणार आहे; तो अभिनेता राजेश खन्नाच्या एका टोपी बाबतचा आहे. ही टोपी साधीसुधी नव्हती तर गोल्फ कॅप होती. या गोल्फ कॅपमुळे आपला चित्रपट यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते आणि ही कॅप त्यांना न मिळाल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला असे त्यांना कित्येक वर्ष वाटत होते! कोणती होती गोल्फ…
आपण गुगलवर जॉनी वॉकर हा शब्द टाईप केला तर लगेच आपल्याला एका व्हिस्कीची माहिती समोर येते कारण जगभर हा ब्रँड खूप लोकप्रिय आहे पण याच नावाचा भारताच्या हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात एक विनोदी अभिनेता देखील होता जॉनी वॉकर! हे नाव त्याला कसं मिळालं याचा एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
शम्मी कपूरने आपल्या उतारवयापर्यंत स्मृतीत जतन करून ठेवली होती! काय होता हा किस्सा? कोण होती ती? कुठे भेटली ही इजिप्शियन मुलगी” हा किस्सा आहे १९५३ सालचा.
१९७२ साली जेरी बटलर याच्या ’वन नाईट अफेयर’ या गाण्यापासून डिस्को युग सुरू झालं असं म्हटलं जातं. त्या दशकात हिप्पी कल्चर रूढ झालं त्यांच्याही ओठी हेच संगीत असायची. आपल्याकडॆ ज्या गाण्याने डिस्को युग सुरू झालं त्या गाण्याची व त्या गायिकेची कथा मनोरंजक आहे.
चित्रपट होता १९९३ साली प्रदर्शित झालेला राजकुमार संतोषीचा ’दामिनी’! आणि अभिनेत्री होती मीनाक्षी शेषाद्री. त्या वर्षीच्या फिल्मफेयर आणि नॅशनल या दोन्ही पुरस्कारांनी तिला हुलकावणी दिली. त्यामुळे चर्चा याचीच जास्त झाली.
संगीतकार वसंत प्रभू यांचे हे शताब्दी वर्ष चालू आहे. अतिशय प्रतिभावान, गुणी परंतु तितकेच कम नशिबी असे या संगीतकाराचे वर्णन करावे लागेल. कारण कला कारकीर्द ऐन बहरात असतानाच त्यांनी या दुनियेतून वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी एक्झिट घेतली.
गौरी शिंदे, शाहरुखची पत्नी हिचे पहिले पुस्तक ‘My Life in Design’ नुकतेच प्रकाशित झाले. या प्रकाशन सोहळ्याला खुद्द शाहरुख उपस्थित होता. यादरम्यानच विचारलेल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शाहरुखने मन्नत कसा घेतला याचा किस्सा सांगितला.
सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यासाठी देखील या काळात एका चित्रपटासाठी किशोर कुमारने पार्श्वगायन केले होते. दिलीप कुमार साठी किशोर कुमार हे कॉम्बिनेशन खूप अनपेक्षित आणि असंभव असे होते कारण कोणी कल्पना देखील केली नव्हती की, किशोर कुमार दिलीप कुमारसाठी प्लेबॅक देऊ शकतो.
१९६४ साली अभिनेता सुनील दत्त याने एक अभिनव प्रयोग रूपेरी पडद्यावर केला. त्याने ’यादे’ या एकपात्री सिनेमाची निर्मिती केली. जागतिक सिनेमाच्या दृष्टीने असा पहिलाच प्रकार होता. जगातला हा पहिला एकपात्री सिनेमा होता.