मराठी चित्रपटात ग्रामीण कथानकावरील सर्वात लोकप्रिय जोडी दादा कोंडके आणि उषा चव्हाण हे सांगायला कोणतेच पंचांग पाह्यची गरज नाही की गुगलवरही जायला नको. ‘सोंगाड्या’पासूनच अशी काही जमली की दादा कोंडके (Dada Kondke) यांची अन्य कोणी नायिका असू शकते यावर पब्लिकचा विश्वास नसे.