‘उत्तर’च्या ट्रेलरमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे आई आणि मुलामधील संवाद, जे आजच्या काळातील प्रत्येक आई आणि मुलाला आपलेसे वाटतील.
“हो आई!” या गाण्यात आई आणि मुलाच्या नात्यातील गोडाई आणि ते जिव्हाळ्याचं भावनिक संबंध फारच सुंदर पद्धतीने व्यक्त करण्यात आले आहेत.
नातेसंबंधांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो यात शंकाच नाही... असंच एक अतुट नातं असतं आई आणि मुलाचा... अभिनय बेर्डे आणि रेणूका शहाणे यांच्या 'उत्तर' या आगामी चित्रपटातून आई-मुलाचं आजच्या पिढीतलं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे... विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत... आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट…