अॅक्शन स्टार अजय देवगण (Ajay Devgan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मग तो 'सिंघम' अॅक्शन-कॉमेडी चित्रपट असो किंवा थ्रिलर 'दृश्यम' (Drishyam Movie) चित्रपट असो… त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. २०२४ मध्येही त्याच्या 'शैतान' (Shaitaan movie) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करुन ठेवलं होतं…काळी जादू, वशीकरण, अंधश्रद्धा यावर कथानक आधारित असणाऱ्या हॉरर-सस्पेन्स 'शैतान'…