१९९३ साली दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ते २०२६ मध्ये दिग्दर्शनातील तब्बल छत्तीसावा चित्रपट या वेगाचे कौतुक करायचं की नवल वाटतं? तेहतीस वर्षांत हे प्रगती पुस्तक आहे. सरळ हिशोब आहे, एका वर्षात एक चित्रपट. खरं तर त्यात तीन चित्रपट जास्तच. ही किमया आहे, दिग्दर्शक विक्रम भट्टची. सध्या तो आर्थिक व्यवहार प्रकरणात गजाआड आहे याची आपणास कल्पना आहेच.…