रविवारी कितीचाही शो पाहिला तरी घरी आल्यावर घरचेच जेवण जेवायची पध्दत होती. मराठी चित्रपट पाहायला जाताना एखाद्या छोट्याश्या डब्यात थालीपीठ, बटाटा पोहे अथवा भजी आणि जोडीला पाण्याची बाटली नेणारे आमच्या गिरगावात अनेक मध्यमवर्गीय होते. आपण चित्रपटाला जातो, यावरचा त्या काळातील फोकस इतका स्पष्ट असे की, घरुन निघाल्यापासूनच डोळ्यासमोर त्याचे थिएटर आणि पडद्यावरचा चित्रपट दिसायला लागे.