मुंबईनंतरची व्यावसायिक म्हणून कुठली यशस्वी रंगभूमी असेल तर ती ‘झाडीपट्टी’. मोसमात सव्वाशे कोटींची उलाढाल झाडीपट्टीत होते. आसावरीसह कित्येक कलावंतांना झाडीपट्टीनं भरभरून दिलंय. म्हणूनच की काय, आसावरीच्या लेखणीतून झाडीपट्टी रंगभूमीची ओळख करून देणाऱ्या ‘झॉलिवूड’ची कथा आकाराला आली. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.