Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !

मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) हे दोघेही आता पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत, आणि तेही झी मराठीच्या नव्या मालिकेमध्ये. हो, तुम्ही बरोबर वाचल आहे.  मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकार असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशाच लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे. हे दोघंही त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. (Tejashree And Subodh Together

Tejashree And Subodh Together

आता हे दोघं एकत्र एका नवीन झी मराठी मालिकेत झळकणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे, आणि त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः जल्लोष पाहायला मिळतो आहे! तेजश्री आणि सुबोधने त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यात ते दोघं एका फ्रेममध्ये दिसत आहेत. या पोस्टला दोघांनीही जाणीवपूर्वक दिलेले कॅप्शनसुद्धा खूप बोलके ठरले.सुबोध भावेने लिहिलं: “होणार सून ती ह्या घरची” तर तेजश्री प्रधानने लिहिलं “तुला पाहते रे” हे दोघं त्यांच्या जुन्या गाजलेल्या मालिकांचा संदर्भ देत, एक नवा अध्याय सुरू करत असल्याचे संकेत देत आहेत. 

Tejashree And Subodh Together

त्यांच्या ही पोस्ट पाहताच चाहते कमेंट्समध्ये अक्षरशः वेडे झाले आहेत,एकाने लिहिल आहे की, “हे खरं आहे का? आमचे फेव्हरेट्स परत आले!” तर अजुन एकाने लिहिल आहे, “तेजु दीदी आणि सुबोध भावे ऑनस्क्रीन = ब्लॉकबस्टर!” झी मराठीनेही त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून या दोघांची झलक असलेली पोस्ट शेअर केली. त्यावर फक्त हार्ट इमोजीचा वापर केला असला, तरी त्याचा प्रभाव प्रचंड होता. एकप्रकारे त्यांनी ही जोडी नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज असल्याची पुष्टीच दिली आहे.(Tejashree And Subodh Together)

===============================

हे देखील वाचा: All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !

===============================

ही नवीन मालिका कोणती असेल, याबाबत अधिकृत तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती ही की या मालिकेचा प्रोमो येत्या २४ जुलै २०२५ रोजी रात्री ८:४० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमधूनच मालिकेच्या नावाचा आणि कथानकाचा उलगडा होईल त्यामुळे प्रेक्षक ही वाट पाहत आहेत.