Skip to content Skip to sidebar Skip to footer

Aashram 3 मध्ये भोपा स्वामी आणि पमी पेहलवान यांच्यातील इंटिमेट सीन्स बद्दल अखेर अभिनेत्याने सांगितलेच, म्हणाला सेटवर कोणीच…

Aashram 3: आश्रम सीझन 3 भाग 2 ची चाहते बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी याचा प्रीमियर झाला. बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत तर चंदन रॉय सन्याल म्हणजेच त्यांचा सहकारी भोपा स्वामीची भूमिका साकारली होती. भोपा स्वामींना बाबा निराला यांचे सर्व रहस्य माहित असतात आणि ते प्रत्येक चुकीच्या कामात त्यांना साथ देतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चंदनने पम्मी कुस्तीपटूची भूमिका साकारणाऱ्या आदिती पोहनकर सोबतचा इंटिमेट सीन कसा शूट करण्यात आला याचा खुलासा केला आहे.(Aashram 3 Intimate Scene)

Aashram 3 Intimate Scene
Aashram 3 Intimate Scene

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत चंदन रॉय सान्याल यांनी आश्रम सीझन 3 भाग 2 मध्ये आदिती पोहनकरसोबत इंटिमेट सीन शूट करण्याविषयी सांगितले आहे की, ‘साहजिकच प्रकाशजी इतके वर्ष आणि इतका अनुभव असलेले मोठे दिग्दर्शक आहेत, त्यामुळे सुरुवातीला हे सीन करताना सेटवर कोणीच नसायचे , फक्त चंदन, जे आमचे डीओपी आहेत, प्रकाश जी, आणि कदाचित सेटवरील वेशभूषेतील मुली, जेणेकरून अदितीला कंफर्टेबल वाटेल. अदिती खूप प्रोफेशनल अभिनेत्री आहे आणि सीनच्या आधी मी तिच्याशी अनेकदा बोललो होतो, मी ऑफस्क्रीनही तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला होता.’

Aashram 3 Intimate Scene
Aashram 3 Intimate Scene

चंदन रॉय सन्याल पुढे म्हणाले की, शोपूर्वी मला तिचा विश्वास जिंकायचा होता, आम्ही अनेक महिने शूटिंग करत होतो आणि आम्ही चांगले मित्र झालो. हे सर्व अभिनेता आणि दिग्दर्शकामुळे शक्य झाले आहे आणि आम्ही गेल्या 5 वर्षांपासून याच शूट करत आहोत, म्हणून आमच्यात एक नाते तयार झाले आहे, आणि आम्ही सगळे कुटुंब आहोत. प्रकाशजींनी एक वेगळी जागा निर्माण केली होती , त्यामुळे तिला सुरक्षित वाटले. आणि या अभिनेत्यावर विश्वास ठेवता येईल असे तिला वाटले आणि म्हणूनच ते करणे शक्य झाले. दरम्यान, ‘आश्रम’ ही वेब सीरिज एक क्राइम ड्रामा सीरिज असून तिने प्रेक्षकांना चांगलेच प्रभावित केले आहे. (Aashram 3 Intimate Scene)
================================

हे देखील वाचा: Loot Kaand Trailer: काला हूं, लाल हूं… वक्‍त के साथ मालामाल हूं! ‘लुट कांड’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज…

================================

‘आश्रम’ ही वेब सीरिज एक क्राइम ड्रामा सीरिज असून तिने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे.प्रेक्षकांना ‘आश्रम ३’ प्राईम व्हिडिओवर पाहता येईल, तसेच एमएक्स प्लेअरवरही पाहता येईल. या सिरिजमधल्या बाबा निराला यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या भागात आश्रमात अनेक नवे कथानक मांडले गेले आहे आणि शेवटच्या भागात ते तुरुंगात जातात.