Skip to content Skip to sidebar Skip to footer

चित्रपट कलाकारांची संघर्ष कहाणीवर आधारित वेबसिरिज ‘इंडस्ट्री’चा ट्रेलर प्रदर्शित

अॅमेझॉन मिनीटीव्हीच्या आगामी ‘इंडस्ट्री‘ या सिरिजचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. या मालिकेत चंकी पांडे, गगन अरोरा, आशा नेगी आणि अंकिता गोराया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनावर आधारित या सिरिजचा ट्रेलर एका महत्त्वाकांक्षी पटकथा लेखकाची कहाणी सांगतो. ‘इंडस्ट्री’मध्ये सिनेसृष्टीत स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यात अनेक नामवंत कलाकारांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले आहेत. मैत्री आणि व्यावसायिक आव्हानांमधील तिचा भावनिक प्रवास, तिचे अतुलनीय प्रेम आणि खोल असुरक्षितता, तिच्या जवळजवळ यशस्वी कथा आणि इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्याच्या संघर्षात तिला येणारे अपरिहार्य धक्के या कथेत अधोरेखित केले आहेत.चला तर मग पाहूया आगामी ड्रामा शो ‘इंडस्ट्री’चा ट्रेलर कसा आहे आणि कोणत्या स्टार्सने ही भूमिका साकारली आहे.(Industry Official Trailer)

Industry Official Trailer
Industry Official Trailer

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईवर आधारित एक मिनिट ५० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये एक महत्वाकांक्षी पटकथा लेखक आयुष वर्माला दाखवण्यात आले आहे, जो चित्रपटसृष्टीत आपला वेगळा असा ठसा उमटवतो. यात आशाला सान्या नावाच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये चंकी पांडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत आयुषला सांगताना दिसतो कग, “मिंटीच्या भूमिकेसाठी आपण अनन्या पांडेला का घेत नाही आहोत?” चंकी पांडे, गगन अरोरा आणि आशा नेगी सारखे कलाकार या ड्रामा शोमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Industry Official Trailer
Industry Official Trailer

ट्रेलरमध्ये आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा पटकथा लेखक कसा संघर्ष करतो आणि या प्रवासात त्याला कशाचा सामना करावा लागतो हे दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांना ही सिरीज मोफत पाहता येणार आहे आणि मुंबईच्या या रोमांचक कथेचा आनंद घेता येईल. या सिरीजबद्दल बोलताना गगन म्हणाला की,”इंडस्ट्री‘ या सिरिजमध्ये आयुषची भूमिका साकारणे हा एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी एक परिवर्तनकारी अनुभव होता. लेखक हा आपल्या उद्योगाचा कणा असतो आणि त्यांचे कष्ट जगणे माझ्यासाठी कॅमेऱ्यासमोरील आणि मागील रेषा धुसर करते. ही व्यक्तिरेखा जिवंत करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून मी त्या लोकांचं महत्त्व पटवून देत काम केलं आहे आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागून योगदान देणाऱ्यांचे महत्त्व आणि मेहनत मी या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून शिकलो आहे.”(Industry Official Trailer)

================================

हे देखील वाचा: Akshay Kumar च्या आगामी ‘सरफिरा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिलीज; अभिनेत्याच्या लुकचं होतय कौतुक

================================

या सिरिजमध्ये अंकिता गोराया, कुणाल कपूर, अभिषेक बॅनर्जी, अमित मसुरकर, सुपर्ण वर्मा, सुनीत रॉय, सुमित अरोरा आणि प्रोसित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अॅमेझॉन मिनीवर ‘इंडस्ट्री’ सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.